शिक्षक हा भारतातला आणि विशेषतः महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त बोलल्या जाणारा विषय. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या प्रमाणेच लोकांसोबत सगळ्यात जास्त संपर्कात येणारा शासकीय नोकरदार वर्ग. आधीच्या अनेक पिढ्या शिक्षक हा व्यवसाय नसून सेवाभावी पेशा आहे, इथपासून ते आता शिक्षक म्हणजे फुकट पैसे खाणारे, कमीत कमी काम करणारे लोक इथपर्यंतचा प्रवास या समूहाने केलेला आहे. शिक्षण क्षेत्रातील सगळ्याच बऱ्यावाईट गोष…
मार्च २०२० नंतर तब्बल वीस महिने बंद असलेल्या माध्यमिक शाळांच्या घंटा या ४ तारखेला पुन्हा वाजल्या. लाखो विद्यार्थी उत्साहाने शाळेकडे धावत निघाले. शिक्षकांनी उत्साहानी त्यांचे स्वागत केलं. त्याच्या बातम्या अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून बघितल्यात. मुलामुलींच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद हा कोणालाही उत्साहित करायला पुरेसा असतो. या सगळ्या उत्सवात काही गोष्टी सुटून गेल्यात. यावेळी जेव्हा सकाळी शा…